”
लेखिकेविषयी
ही कहाणी आहे अनिता मूरजानी या कॅन्सर पेशंटची. चार वर्ष चाललेल्या तिच्या जीवघेण्या लढाईची. एक एक अवयव निकामी होत गेला आणि अखेर ती शेवटच्या घटका मोजू लागली. मृत्यूला तिने स्पर्श केला आणि एक विलक्षण साक्षात्कार तिला झाला… तो म्हणजे आपल्या शरीरापलीकडच्या अस्तित्वाचा. तिथे मृत्युची भीती संपली… जीवन अमर्याद आहे हे कळून चुकले. हेही लक्षात आले की तिला बरे करण्याचे सामर्थ्य तिच्याचकडे आहे. आणि अनिता मृत्युच्या जगातून परत फिरली ती खडखडीत बरी होऊनच. आता ती संपूर्ण रोगमुक्त झालेली होती. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स देखील थक्क झाले. या जीवनात असे अनेक चमत्कार घडू शकतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते!
पण ह्या पुस्तकाचे महत्व या चमत्कारापेक्षा खूप जास्त आहे.
‘मी कोण आहे?’ हा माणसाला सुरवाती पासून पडलेला प्रश्न. दैनंदिन जीवन जगत असताना कराव्या लागणार्या विविध भूमिका म्हणजे मी आहे का? की शरीर म्हणजे मी आहे? शरीराच्या माध्यमातून मी जीवनाचा अनुभव घेतो की मी साक्षात जीवनच आहे? जीवनाने शरीराच्या माध्यमातून घेतलेला मानवी जीवनाचा अनुभव म्हणजेच माझे जीवन तर नव्हे? तसे असेल तर ‘मी’ जन्म मृत्यूच्या पल्याडचे अस्तित्वच आहे, नाही का? हे आणि यासारखे असंख्य प्रश्न माणसाला अगदी सुरूवातीपासून पडलेले आहेत. या सर्व मूलभूत प्रश्नांच्या उत्तराचे दिग्दर्शन करण्याचे सामर्थ्य ‘आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला’ या पुस्तकात आहे. हेच त्याचे बलस्थान आहे.
परत फिरणे किंवा न फिरणे, निवडीचे मला स्वातंत्र्य होते…
स्वर्ग हे स्थान नाही तर ती एक अवस्था आहे हे कळताच मी परत फिरले…
“
Reviews
There are no reviews yet.