आपल्या जीवनातील छोटे-छोटे त्रास दूर करण्याचे सोपे मार्ग
‘डोंट स्वेट द स्मॉल स्टफ’ या मालिकेच्या जगभरात 25 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेलेल्या आहेत.
आम्ही वीस वर्षांपूर्वी ‘डोंट स्वेट द स्मॉल स्टफ’मधून जे शिकलो होतो, त्याला सकारात्मक मनोविज्ञानातील दशकभराच्या संशोधनाने मान्यता दिलेली आहे. हे एक अद्भुत पुस्तक तुम्हाला प्रसन्नता मिळवून देणारे एक वरदान ठरू शकते.
– शॉन एकोर, ‘द हॅपीनेस अॅडव्हांटेज’चे बेस्टसेलर लेखक
हे एक अद्भुत आणि उल्लेखनीय प्रेरक-मार्गदर्शक पुस्तक आहे. आत्म-विकासाच्या पुस्तकामध्ये ‘क्लासिक’ म्हणता येईल या श्रेणीतील आहे. जीवनातील आव्हानांकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवे हे दाखवून देणारे हे पुस्तक आहे. दिवसभरात छोटे छोटे बदल करून तुम्ही ताण आणि त्रास कसे कमी करू शकता आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने जाण्याचा मार्ग कसा शोधू शकता, हे सांगण्याचे काम हे पुस्तक करते. या पुस्तकात पुढील बाबी आपल्याला वाचायला मिळतील –
* आपल्या समस्यांनाच आपले भविष्याचे शिक्षक माना
* एका वेळी एकच काम करा
* यश वाटून घ्यायला शिका
* आपल्या सहज प्रवृत्तीवर विश्वास ठेवायला शिका
रिचर्ड कार्लसन हे पी.एच.डी.धारक असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि अनेक पुस्तकांचे बेस्टसेलर लेखक म्हणून जगाला सुपरिचित आहेत. त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके खालीलप्रमाणे :
डोंट स्वेट द स्मॉल स्टफ, डोंट स्वेट द स्मॉल स्टफ अबाउट मनी, डोंट स्वेट द स्मॉल स्टफ विद युअर फॅमिली, डोंट स्वेट द स्मॉल स्टफ अॅट वर्क, डोंट स्वेट द स्मॉल स्टफ फॉर टीन्स. या शिवाय त्यांनी पत्नी सहलेखिका असलेले डोंट स्वेट द स्मॉल स्टफ इन लव्ह.
Reviews
There are no reviews yet.