”
स्व-सामर्थ्याचे भान देणारे अद्वितीय तंत्र
द सिल्वा माइंड कंट्रोल हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर एक कोटीपेक्षाही जास्त लोक माइंड कंट्रोल या तंत्रामध्ये पारंगत झाले आहेत. आपल्या मनाचा सूक्ष्म स्तरांवरून अधिक परिणामकारक पद्धतीने वापर करण्याचं कौशल्य या सार्यांनी आत्मसात केलं आहे. या पद्धतीच्या आधारे अगदी झोपेतसुद्धा मनाचा प्रभावीपणे वापर करणं त्यांना शक्य झालं आहे.
जोस सिल्वा यांनी तयार केलेल्या 4 दिवसांच्या अप्रतीम कोर्सवरच हे पुस्तक आधारलेलं आहे. आपलं जीवन परिवर्तीत करण्याची क्षमता असणारं हे पुस्तकं वाचकाला माइंड कंट्रोल तंत्राच्या आधारे तणावातून मुक्त कसं व्हावं, वाईट आणि चुकीच्या सवयी कशा सोडाव्यात, भावनिक असुरक्षितता कशी दूर करावी, तसंच दुर्धर व्याधींना कसं पळवून लावावं याबाबत मार्गदर्शन करतंच, पण त्याबरोबरच सर्जनशील अशा ‘व्हिज्युअलायझेशन’ च्या मदतीने आपल्याला जे ‘हवंय’ ते ‘पाहण्याचं’ आणि कालांतराने ते ‘प्रत्यक्षात आणण्याचं’ तंत्रदेखील साध्य करायला शिकवतंं.
द सिल्वा माइंड कंट्रोल या अत्यंत अनोख्या अशा पद्धतीची सर्वांगीण व परिपूर्ण माहिती देणारं हे अत्यंत महत्वाचं पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं असंच!
“
Reviews
There are no reviews yet.