द कोचिंग हॅबीट
कमी बोला, जास्त प्रश्न विचारा आणि नेतृत्व करण्याची आपली पद्धत कायम स्वरूपी बदलून टाका
प्रशिक्षणाशी संबंधित सात प्रमुख प्रश्नांच्या आधाराने मिशेल बंगे स्टेनर यांनी त्याचे सगळे सार एकत्रित आणले आहे. त्यांच्या वरकरणी साध्या वाटणा-या, परंतु सिद्ध झालेल्या अशा तंत्राला तुम्ही अवगत केले तर तुम्हीही त्यात पारंगत व्हाल आणि तुम्ही तुमच्या कर्मचा-यांना आणि तुमच्या सहका-यांना अधिक प्रभावी सहयोग देऊ शकाल. आणि तुम्हाला हेदेखील लक्षात येईल की तुम्ही स्वत:च्या नजरेमध्ये एक उत्तम प्रशिक्षक बनलेले आहात.
– डॅनियल पिंक, टू सेल इज ह्युमन अँड ड्राईव्ह’ या पुस्तकाचे लेखक
हार्लन हॉवर्ड म्हणतात, की प्रत्येक महान देशाच्या दृष्टीने त्यांचे तीन सूर आणि सत्य महत्त्वाचे असते.
या पुस्तकातून आपल्याला सात प्रश्न सापडतात आणि या साधनाच्या आधाराने काम केल्यास कमी कष्टामध्ये अधिक परिणामकारक काम साध्य होऊ शकते.
सल्ला देण्यापेक्षा, तयार उत्तरे हाती देण्यापेक्षा किंवा पर्याय सुचवण्यापेक्षा प्रश्न विचारण्यासाठी अधिक धाडस लागते. या एका व्यावहारिक आणि प्रेरणादायी अशा पुस्तकामध्ये मायकल हे आमूलाग्र परिवर्तन घडवू शकणारे सात प्रश्न उपस्थित करतात. नेतृत्वात किंवा सहकार्यात बदल घडवण्याचे सामर्थ्य या प्रश्नांमध्ये निश्चितपणाने आहे.
– ब्रेनी ब्राऊन, ‘रायझिंग स्ट्राँग आणि डेअरिंग ग्रेटली’ या पुस्तकाचे लेखक.
हे पुस्तक संपूर्णत: व्यावहारिक पातळीवरचे, उपयुक्त आणि उत्सुकता वाढवणारे प्रश्न, संकल्पना आणि साधने यांनी भरलेले आहे. नेतृत्व करणा-या कोणत्याही नेत्याला अधिक चांगले करण्याची दिशा यातून नक्की मिळू शकेल.
– डेव्ह अलरिच, ‘द व्हाय ऑफ वर्क’ आणि ’द लिडरशिप कोड’ या पुस्तकांचे लेखक.
Reviews
There are no reviews yet.