”
‘आध्यात्मिक शोधाच्या या युगात हे पुस्तक अत्यंत
वाचनीय आहे.’ इंडीपेन्डंट – रविवार आवृत्ती
प्रेमाचं संपूर्ण नवीन मानसशास्त्र,
पारंपरिक नीतिमूल्यं आणि आध्यात्मिक प्रगती
समस्यांना सामोरं जाणं आणि त्या सोडविणं ही एक दुःखदायक प्रक्रिया आहे, जी टाळण्याचा बहुतेकजण प्रयत्न करतात; परंतु या टाळण्यामुळेच जास्त दुःख निर्माण होतं आणि मानसिक व आध्यात्मिक प्रगति खुंटते.
डॉ. एम्. स्कॉट पेक जे एक मनोविकारतज्ज्ञ आहेत, ते स्वतःच्या व्यावसायिक अनुभवांंच्या आधारे आपल्याला समस्यांना तोंड देण्याचे व बदलांमुळे निर्माण झालेलं दुःख भोगण्याचे असे मार्ग सुचवितात, जे आपल्याला आत्मज्ञानाच्या पुढील उच्च पातळीवर पोहोचवितात. प्रेमळ नातेसंबंधांचं स्वरूप त्यांनी स्पष्ट केलं आहेः खरीखुरी अनुरूपता कशी जाणावी, अवलंबुन असणं व प्रेम यांतील फरक कसा ओळखावा, स्वयंपूर्ण व्यक्ती कसं बनावं आणि जास्त संवेदनाक्षम पालक कसं व्हावं.
‘‘विलक्षण… हे केवळ एक पुस्तक नसून, औदार्याची एक उत्स्फुर्त कृति आहे अशा लेखकाची, ज्याने वाचकांच्या हृदयाला स्पर्श करत स्वतःपेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी त्यांना देऊ केलंय.’’ वॉश्गिंटन पोस्ट
आनंदी जीवन कसं निर्माण करावं यासाठी अतिशय उपयुक्त सल्ला. – डेली मेल
“
Reviews
There are no reviews yet.