Description
कुटुंब आणि आरोग्यासाठी
होमिओपॅथी चिकित्सा शास्त्र
हे पुस्तक विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, जे स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी स्वतः घेऊ इच्छितात. स्व-चिकित्सेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याशिवाय होमिओपॅथीचे विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या प्रारंभीच्या टप्प्यातील होमिओपॅथ यांच्यासाठीही हे मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाचा पहिला भाग वाचकांना आरोग्याविषयी होमिओपॅथीचा सरळ आणि सोपा दृष्टिकोन समजावून सांगतो. तसेच या भागात अशा सामान्यतः उपयोगी पडणार्या औषधांची यादी दिली आहे, जी सहजपणे उपलब्ध आहेत आणि घरी ठेवता येऊ शकतात.
दुसर्या भागात या शास्त्राचा रोग निवारणासाठी प्रत्यक्ष उपयोग विस्ताराने समजावण्यात आला आहे. उदाहरणार्थ-रोग, त्याचे निदान आणि त्याच्या निवारणासाठी तीन अत्यंत प्रभावी उपाय दिले आहेत, ज्यांचा उपयोग आजार दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
पुस्तकाचा तिसरा भाग बी.एच.एम.एसच्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच ज्यांना होमिओपॅथीचे ज्ञान आहे आणि जे रोगांची नावे व त्यांची लक्षणे पाहून योग्य अशी सिंगल रेमेडी निश्चित करू शकतात, अशा व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे.






Reviews
There are no reviews yet.